सावंतवाडी / प्रतिनिधी
नेमळे गावकर-कुंभारवाडी येथील युवक विनायक बाबली पांगम( वय ३५) सायं ७.३० वा कामावरुन घरी येत असताना मुंबई वरुन गोव्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारने धडक दिल्याने पांगम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पांगम यांचा जागीच मृत्यू झाला .हाअपघात विनायक पांगम यांच्या घराशेजारी झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर झाला .झाराप पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर आजपर्यंत पन्नास हून अधिक गंभीर अपघात झाले. यात वीस हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागलाय . अशाप्रकारचे जीवघेणे अपघात हे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग यांच्या मनमानी कारभारामुळे होत असल्याचा आरोप नेमळे ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग संबंधित अधिकारी यांच्यावर केले आहेत .यासंबंधी नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना धारेवर धरत सोमवारी सकाळी १० वा.नेमळे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि सावंतवाडी पोलिस स्टेशनचे निरीक्षक मेंगडे यांच्या समवेत राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणारे अपघात कशाप्रकारे रोखता येतील यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासंबंधी अतीतातडीची सभा आयोजित केली आहे. या सभेला नेमळे गावातील सर्व ग्रामस्थानी उपस्थित रहावे. अशी विनंती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यानी केली आहे.









