विनायक कित्तूर स्मॅशर : ब्लॉकर तौकीर दफेदार
बेळगाव : न्यू गांधीनगर येथील न्यू स्टार डेव्हलपर्स आयोजित निमंत्रितांच्या 35 वर्षावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत नेहरुनगर संघाने एनएसडी बी संघाचा 2-1 अशा सेट्समध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट स्मॅशर विनायक कित्तूर, उत्कृष्ट ब्लॉकर तौकीर दफेदार यांना गौरविण्यात आले. गांधीनगर येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धा पुरस्कर्ते न्यू स्टार डेव्हलपर्सचे संचालक इजाज हकीम, इम्रान शेख, आसिफ लिगाडे, हर्षवर्धन शिंगाडे, राजू चौगले आदी मान्यवरांच्या हस्ते नेटवरील फीत सोडून करण्यात आले. या स्पर्धेत 10 संघांनी भाग घेतला होता. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्या एनएसडीबी संघाने नेहरूनगर वॉरियर्स संघाचा 21-18, 21-19 अशा गुण फरकाने तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नेहरूनगर स्टेडियम संघाने एनएसडीसी संघाचा 21-17, 20-22, 15-10 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात नेहरूनगर स्टेडियम संघाने एसएसडीबी संघाचा 25-21, 25-20 अशा गुण फरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. विजेत्या संघाला पुरस्कर्ते इजाज हकीम, इम्रान शेख, असिफ लिगाडे, हर्षवर्धन शिंगाडे, राजू चौगले यांच्या हस्ते विजेत्या नेहरूनगर स्टेडियम संघाला 5 हजार रूपये रोख व चषक तर उपविजेत्या एनएसडीबी संघाला 3 हजार रूपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट स्मॅशर विनायक कित्तूर (नेहरूनगर स्टेडियम), उत्कृष्ट ब्लॉकर तौकीर दफेदार (एनएसडीबी) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून हर्षवर्धन शिंगाडे, राजू चौगले, उमेश मजूकर यांनी काम पाहिले.









