केंद्र सरकारने तीन मूर्ती भवन परिसरात असलेल्या नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे नामकरण ‘पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी’ असे केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्मायाचे काँग्रेसने याला “क्षुद्र कृत्य” असे वर्णन केले आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या तीन मूर्ती भवनच्या जागेवर पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर सोसायटीचे नाव बदलण्यात आले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी (NMML) च्या विशेष बैठकीत त्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संस्कृती मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे उपाध्यक्ष असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते.
बैठकीतील आपल्या भाषणात, मंत्री सिंग यांनी “नाव बदलण्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले” कारण संस्थेच्या नवीन स्वरूपात जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचे योगदान हे मंत्रालय प्रदर्शित करत आहे. पंतप्रधानांचे एक संस्था म्हणून वर्णन करून आणि विविध पंतप्रधानांच्या प्रवासाची इंद्रधनुष्याच्या विविध रंगांशी तुलना केली. तसेच “इंद्रधनुष्याचे सर्व रंग ते सुंदर बनविण्यासाठी प्रमाणानुसार प्रतिनिधित्व केले पाहिजेत” असेही ते म्हणाले.









