Neha Jadhav came first and Mrinal Sawant came first in the record dance competition at Nirwade
श्री शिलकारी कला क्रिडा सेवा मंडळ , निरवडे भंडारवाडी आयोजित प्राथमिक शाळा नं . ३ येथे प्रजाकसत्ता दिनानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेकॅार्ड डान्स स्पर्धेत नेहा जाधव ( इन्सुली ) याने प्रथम क्रमांक पटकाविला. व्दितीय क्रमांक मृणाल सावंत ( कुडाळ ) तर तृतीय क्रमांक पूजा राणे ( रेडी ) यांनी मिळविला .
यावेळी स्पर्धेचे उद्धाटन निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच सुहानी गावडे , माजी सरपंच हरि वारंग , माजी उपसरपंच चंद्रकांत गावडे , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदा गावडे , श्री पाडगावकर सुभाष मयेकर, प्रा.खडपकर , वैभव खानोलकर, समिर केरकर ग्रामस्थ व महिलावर्ग आदी उपस्थित होते . या स्पर्धेचे परीक्षण प्रा.खडपकर व वैभव खानोलकर यांनी केले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी व समिर केरकर यांनी केले. या स्पर्धेसाठी एकूण ३८ स्पर्धकांना सहभाग घेतला होता .
न्हावेली / वार्ताहर









