पाईपलाईन दुरूस्तीसाठी खोदलेला ख•ा दुरूस्तीविना अद्याप तसाच : ग्रामपंचायतीने लक्ष घालून त्वरित बुजविण्याची मागणी
वार्ताहर /अगसगे
अगसगे गावातील मुख्य रस्त्याच्याकडेला ग्राम पंचायतीने गेल्या एक वर्षापूर्वी पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदाई करून खड्डे काढला होता. मात्र, अद्याप पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही व खड्डे देखील बुजवला नाही. याकडे ग्रामपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अगसगे-बेळगाव या मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असते. यामुळे वाहनचालकांना याचा अत्यंत धोका निर्माण होत आहे. रात्रीच्यावेळी अंधारात समोरून चारचाकी वाहनाला जाण्यास बाजू देताना इतर वाहने ख•dयाकडे वळत आहेत. यावेळी वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवणे भाग पडत आहे.
धोकादायक खड्डे
पाईपलाईन नादुरुस्त असल्याने ख•dयामध्ये पाणी तुंबलेले असते. जनावरे पाणी पिण्यासाठी गेल्यास पडून जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीकडे वारंवार तक्रारदेखील केली आहे.
गल्लीत नळांना सोडलले पाणी वाया
गल्लीमध्ये पाणी सोडले असता या नादुरुस्त पाईपलाईनमधूनच पाण्याचा पुरवठा होतो. यामुळे निम्मे पाणी या खड्डे यामधून रस्त्यावर वाहते. सध्या गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तशातच खड्डे यामधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे ग्रामस्थांतून ग्राम पंचायत ग्रामविकास अधिकारी व अध्यक्षांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
अनर्थ घडल्यास जबाबदार कोण?
रस्त्याशेजारी खड्डे काढण्यात आला आहे. एक वर्षापासून पाईपलाईन दुरुस्ती केली नाही. या खड्डे यामध्ये पाणी तुंबून असते. रस्त्याशेजारी अनेक घरे आहेत. लहान मुले या ठिकाणी खेळत असतात. यावेळी कोणताही अनर्थ घडल्यास त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहील, असा आरोप दलित नेते शिवपुत्र मेत्री यांनी केला आहे. या मार्गावरून अगसगे, चलवेनहट्टी, म्हाळेनहट्टी, हंदिगनूर, कुरिहाळ, बोडकेनहट्टी, निंगेनहट्टी, दिंडलकोप, राजगोळी, द•ाr, मोदगा, एकस साखर फॅक्टरीची वाहनांची दिवसरात्र वर्दळ असते. तरीदेखील ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे नाराजी व्यक्त होत आहे. तरी या ठिकाणची पाईपलाईन दुरुस्ती करून त्वरित ख•ा बुजवावा, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे. अन्यथा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.









