ऐतवडे / प्रकाश सादळे :
बुद्रुक वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाची ओढ्याकडेला असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. या स्मशानभूमीमध्ये कोणतीही सुविधा नाही. सिमेंट कॉक्रीटीकरण उचकटलेला अवस्थेत आहे. पत्रा जळून खाक झालेला आहे. अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसण्यासाठी बांधलेले शेडला भेगा पडलेल्या आहेत.
पावसाळ्यात अत्यंसस्कार करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली. एका महिलेचा मृत्यू झाल्याने मृतदेह अंत्यविधीला स्मशानभूमीत घेऊन जात होते. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे ठीकठिकाणी पाणी साचले होते. त्यातूनच मार्ग काढत जावे लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवले आहे. लाईटचा खांब असून त्याचा प्रकाश अपुराच आहे. स्मशानभूमीचे पत्रे जळाल्याने गळती लागली आहे.
स्मशानभूमीमध्ये मृतदेह नेताना तारेवरची कसरत करत स्मशानभूमीत न्यावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे. येथील प्रशासन या बाबींकडेकानाडोळा करत आहे. ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी मुरूम टाकून व तणनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
- दखल कोण घेणार?
गावच्या मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची इतकी दुरावस्था झाली आहे की याची समाजात तसेच नातेवाईकांमध्ये चर्चा होत आहे. एखादा मृतदेह घेऊन जायचे असेल तर तारेवरची कसरत करत जावे लागते. शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून याची दखल घ्यावी एवढीच मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे.
-बाळासाहेब कांबळे ज्येष्ठ नागरिक, माजी एसटी कंडक्टर
- प्रशासनाकडे मागणी
मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की, एखादे मृतदेह घेऊन जावे लागत असेल तर गुडघाभर चिखलातून जावे लागत आहे. मृतदेह घेऊन स्मशानभूमीमध्ये मृतदेह नेताना तारेवरची कसरत करत स्मशानभूमीत न्यावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे. येथील प्रशासन या बाबींकडे जाताना चौघेजण लागतात तर त्या चौघांना प्रत्येकाने धरून सात-आठ लोकांना मृतदेह न्यावा लागत आहे.
– तेजस कांबळे
- चारच दिवसात दुरुस्ती
ऐतवडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. स्मशानभूमीच्या शेडचे पत्रे संपूर्णपणे सडलेले आहेत. वारंवार दुरुस्त करून देखील आता स्मशानभूमीच्या शेडचे संपूर्ण पत्रे सडलेले आहेत. ते ग्रामपंचायतीच्या वतीने चार दिवसाच्या आत नवीन पत्रे बसवण्याची व्यवस्था करु अशी ग्वाही ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.
-संदीप उर्फ राजू गायकवाड उपसरपंच, ऐतवडे बुद्रुक








