जांबोटी–खानापूर मार्गावरील पुलाची त्वरित दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
जांबोटी : जांबोटी-खानापूर राज्य महामार्गावर वडगाव फाट्यानजीकच्या नाल्यावरील मोरीचा एका बाजूचा संरक्षक कठडा वर्षभरापूर्वी कोसळला आहे. मात्र त्याच्या दुऊस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. तसेच अऊंद रस्त्यामुळे अपघातदेखील घडत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर मोरीची त्वरित दुऊस्ती करावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत-जांबोटी राज्य महामार्गा अंतर्गत होतो. खानापूर तालुक्मयातील आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा रस्ता असला तरी रस्त्याच्या विकासाकडे शासनाचे अद्याप दुर्लक्ष झाल्यामुळे वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागतो. वडगाव फाट्यानजीकच्या मोरीचा एका बाजूचा संरक्षक कठडा व मोरीचा बराचसा भाग वर्षभरापूर्वी कोसळल्याने रस्तादेखील काही प्रमाणात खचला असून वाहतुकीला धोकादायक बनला आहे. तसेच अऊंद रस्त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्पुरता संरक्षक कठडा अथवा वाहनधारकांना धोक्मयाची सूचना देणारा कोणताही सूचनाफलक देखील लावला नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात मोठा अनर्थ घडण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे. तरी आमदार विठ्ठल हलगेकर व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून मोरीची त्वरित दुऊस्ती करून रस्ता वाहतुकीला सुरळीत करावा, अशी मागणी जांबोटी ग्रा.पं. सदस्य सूर्यकांत साबळे यांनी दिला आहे.









