बेळगाव : सदाशिवनगर येथील कलमठ लिंगायत स्मशानभूमीत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली. स्मशानभूमीचा विकास करण्यात पालिकेला रस नसल्याचे पाहणीत आढळून आले असून विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचाही संशय बळावला आहे. लिंगायत युवा संघटना व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्मशानभूमीला भेट देऊन रविवारी पाहणी केली. कलमठ स्मशानभूमीच्या विकासासाठी 96 लाख रुपये मंजूर झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात पाण्याची व्यवस्था नाही. विद्युत दिव्यांची व्यवस्था नाही. पेव्हर्स व्यवस्थितपणे बसविण्यात आले नाहीत. केवळ 15 लाखात शौचालयांची उभारणी करायची आहे, असे कंत्राटदार सांगतो.एकंदर स्मशानभूमीची पाहणी केली असता महानगरपालिकेला लिंगायत स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी इच्छाशक्ती नसल्याचे जाणवते, असा सूर पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून दिसून आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, राजीव टोपण्णावर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रभू यत्नट्टी, बसवराज रोट्टी, मंजुनाथ, रविंद्र बेल्लद, प्रकाश ककमरी, संतोष कागवाडे, नागराज दोडमनी, पवन आदींसह युवा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिका आयुक्तांनी कंत्राटदारावर त्वरित कारवाई करावी. लिंगायत स्मशानभूमीचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली.
Previous Articleआता वडगावमध्ये ‘बेळगाव- वन’ कार्यालय
Next Article मजगाव येथील गाडे यात्रेला उत्साहात प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









