बेळगाव : शहरातील कचऱ्याची योग्यरित्या उचल होत असल्याचा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. अनगोळ इंदिरानगर, झटपट कॉलनी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून प्रचंड कचरा पडला असला तरी त्याची उचल न केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरातील कचऱ्याची उचल आणि वर्गीकरण 90 टक्के पूर्ण झाल्याचे महानगरपालिकेकडून सांगितले जात आहे. मात्र महानगरपालिकेचा हा दावा फोल ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून अनगोळ इंदिरानगर, झटपट कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्याची तातडीने उचल करावी, अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी सदर ठिकाणी मनपाकडून कचरा टाकू नये असा फलक लावला होता. पण फलक गायब झाल्याने पुन्हा नवीन फलक उभारावा, अशी मागणी होत आहे.
Previous Articleकडोली, आंबेवाडी, गोमटेश, राकसकोप अंतिम फेरीत
Next Article खानापूर येथे द्वितीय भाषा विषयाची कार्यशाळा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









