ऑनलाईन टीम / मुंबई :
सर्वोच्च न्यायालयाने NEET PG परीक्षा 6 ते 8 आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 12 मार्चला होणारी ही परीक्षा आता मे-जूनमध्ये होण्याची शक्यता आहे.
नीट पीजी परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, कोविड-19 मुळे एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचा इंटर्नशिप कालावधी पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे ते परीक्षेला बसू शकणार नाहीत. अशा स्थितीत जोपर्यंत इंटर्नशिप पूर्ण होत नाही तोपर्यंत परीक्षेची तारीख वाढवावी. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती चंद्रचूड आणि सूर्यकांत यांनी यासंबंधी सुनावणी घेत संबंधित परीक्षा 6 ते 8 ते आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.