मुंबई/प्रतिनिधी
मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. राजन यांनी नुकताच तमिळनाडू सरकारला नीट परीक्षेसंदर्भात एक अहवाल दिला आहे. नीट परीक्षा सुरु राहिली तर भविष्यात तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी डॉक्टर्स देखील मिळणार नाहीत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याविषयी आपली भूमिका मांडली आहे. रोहित पवारांनी नीट परीक्षेला माझा विरोध नाही, राष्ट्रीय स्तरावरच्या संधी उपलब्ध होणं, यासारखे नीट चे अनेक फायदेही आहेत. पण यामुळं गरीब विद्यार्थी मागे पडू नये त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान याविषयी बोलताना रोहित पवार यांनी , “नीट परीक्षेला माझा विरोध नाही, राष्ट्रीय स्तरावरच्या संधी उपलब्ध होणं, यासारखे नीट चे अनेक फायदेही आहेत. पण यामुळं गरीब विद्यार्थी मागे पडू नये, हा माझा प्रमुख मुद्दा असून तसं होत असेल तर त्याला बळ देण्याची गरज आहे. कुठलीही गोष्ट असू द्या त्याचे फायदे-तोटे असतात. त्याप्रमाणे नीट परीक्षेचेही आहेत. फक्त यात कोणाचं जास्त नुकसान होणार नाही आणि आर्थिक कारणामुळं कोणी स्पर्धेत मागं पडणार नाही, याची काळजी सरकारला घ्यावी लागेल आणि ती केंद्र आणि राज्य सरकारे घेतील, ही अपेक्षा!”