वृत्तसंस्था/ डरहॅम (ब्रिटन)
इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने संघाची घोषणा केली आहे. 15 जणांच्या संघातून अष्टपैलू नीशमला वगळण्यात आले आहे. नीशमने आतापर्यंत किमान 150 सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत नीशमने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन घडविताना फलंदाजीत 232 धावा तर गोलंदाजीत 15 गडी बाद केले होते.
आता न्यूझीलंड संघामध्ये नीशमच्या जागी दुसरा अष्टपैलू कोले मॅकाँचीचा समावेश करण्यात आला आहे. उभय संघामध्ये टी- 20 चे चार सामने खेळविले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी खेळविला जाईल. या मालिकेनंतर उभय संघामध्ये चार सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
न्यूझीलंड टी-20 संघ – टीम साऊदी (कर्णधार), अॅलेन, चॅपमन, कॉनवे, फर्ग्युसन, हेन्री, जेमिसन, मॅकाँची, मिल्ने, मिचेल, फिलिप्स, रचिन रवींद्र, सँटेनर, सिफर्ट आणि सोधी.









