बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यातून नीना स्पोर्ट्सने कर्नाटक क्रिकेट क्लब अ चा तीन गड्यांनी बीएससीए बी.ने टॅलेंट हुबळीचा 113 धावांनी पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळवले. अंगदराज हितलमनी, ध्रुव देसाई यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात कर्नाटक क्रिकेट क्लब अ ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडीबाद 262 धावा केल्या. त्यात तेजस मुर्डेश्वर 4 षटकार 4 चौकारांसह 68, यश कुरबने एक षटकार 5 चौकारांसह 51, आदित्य शानभागने 7 चौकारांसह 39, शंकरगौडा पाटीलने 24 तर आदर्श नाईकने 23 धावा केल्या, नीना स्पोर्ट्स तर्फे स्वरूप साळुंखे, माझीद मकानदार, नवीन शिरगावी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना स्पोर्टसने 37.2 षटकात 7 गडीबाद 266 धावा करून सामना 3 गड्यांनी जिंकला. त्यात अंगदराज हितलमनीने 4 षटकार 8 चौकारांसह नाबाद 113 धावा करून शतक झळकवले. त्याला माझीद मकानदारने 2 षटकार 5 चौकारांसह 42 करीत सुरेखसाथ दिली. कर्नाटक क्रिकेट क्लब तर्फे आदर्श नाईकने 64 धावा 3 तर संकेत नाईक व संतोष लमानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब बीने प्रथम फलंदाजी करताना 37.4 षटकात सर्व गडी बाद 234 धावा केल्या. त्यात ध्रुव देसाईने 66, शिवम नेसरीकरने 44, अर्नव नुगानटीने 28, बाबू गदमने 22 धावा केल्या. टॅलेंट तर्फे सुमित नायकने चार गडी बाद केले. त्यानंतर टॅलेंट स्पोर्ट्स हुबळी संघाचा डाव 31.3 षटकात 109 धावांत टोपला. त्यात वीरेशने 36 तर रवी कुमारने 28 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब तर्फे ध्रूव देसाईने 6 गडी गडी बाद केले.









