शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. तो वाढदिवस रक्तदान शिबीर आणि अन्य उपक्रमामधून साजरा केला जातो. त्यानुसार सर्वांनी वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केले. यंदा देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाआरती आणि प्रेमरुपी असा मोदक बाप्पा चरणी अर्पण करणार असल्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी युती सरकारवर त्य़ांनी सडकून टाका केली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, युती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य होईल तेव्हा करावा, कायदा नेमका काय आहे ते सर्वच न्यायालय सांगत असते. तो कायदा अशा पद्धतीने जर कोणाचा अविर्भाव असेल तर तो फार काळ काही टिकत नाही हा माझा अनुभव आहे. धाराशिव, संभाजीनगर हे नामांतर हे जनमानसात रुजलेले विषय आहेत. याबद्दल अल्पमत बहुमत याचा विचार करायचा नसतो. त्यामध्ये जनतेच्या मनाचा विचार करायचा एवढच लक्षात ठेवाव असेही त्या म्हणाल्या. पुढे बोलताना त्य़ा म्हणाल्या , मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर, आठ-दहा दिवसांनी चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच त्यावर भाष्य करण योग्य राहील. त्याचबरोबर काही लोकांनी आताच पळ काढलेला दिसत आहे. त्यांच्या मनात काय आहे. हे सर्व जनतेला माहिती आहे. तरी माझ्या प्रत्येकाला शुभेच्छा आहेत, असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा- आरे मेट्रो कारशेड संदर्भात सोमय्यांच ट्विट; म्हणाले,काम थांबवण्याचा आदेश नव्हता…
बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून जल्लोष करतात, त्यांच्या निष्ठेबाबत मी काय बोलणार.” तसेच, “जे आज माझ्यावर टीका करतात, त्यांना जर परत कधी यायचं असेल, तर ताईच्या आपण लक्षात राहाव हाच, या मागील हेतू असणार अस म्हणत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
Previous Articleकर बुडव्या व्यापाऱ्यांना चौदा लाखांचा दंड
Next Article सन्मानचिन्ह आम्ही गाबित असल्याचेच प्रमाण









