आमदार प्रवीण आर्लेकर : कोरगाव येथे शिवजयंती उत्सवात विविध मान्यवरांचा गौरव
पेडणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे आचार आणि विचार आज नागरिकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले. देऊळवाडा कोरगाव येथे शिवजयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यसपीठावर मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, कोरगाव सरपंच समीर भाटलेकर, हरमल जि. पं. सदस्य रंगनाथ कलशावकर, धारगळ जि. पं. सदस्य मनोहर धारगळकर, तोर्से जि. पं. सदस्य सीमा खडपे, नगराध्यक्ष माधव सीनाई देसाई, पंच देविदास नागवेकर, पंच अब्दुल नाईक, सौ. कोरगावकर, उपसरपंच कल्पिता कलशावकर, पंच नीता नर्से, माजी जि. पं. सदस्य दीपक कळंगुटकर, पार्से सरपंच अजय कळंगुटकर, तुये सरपंच लक्ष्मी नाईक, माजी सरपंच सुदीप कोरगावकर, उल्हास देसाई, पंच मालपेकर, उद्योजक श्याम शेट्यो, माजी प्राचार्य सुदन बर्वे, राजन कोरगावकर, समितीचे संजय कामुलकर, वसंत शिरोडकर, कृष्णा गावडे, संतोष पालयेकर, उमेश तळवणेकर, सुभाष केरकर, केशव शेट्यो, आदींसह नागरिक उपस्थित होते.
छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्थापन करून त्यांनी तळागाळातील जनतेला योग्य आणि समान न्याय दिला. तशाच प्रकारे आजच्या लोकप्रनिधीनी जनतेची सेवा करावी, असे आवाहन आमदार जीत आरोलकर यांनी केले. सुदन बर्बे यांनी प्रास्ताविकांत शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन संजू कामुलकर यांनी केले. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर , आमदार जीत आरोलकर, यांच्यासह अन्य मान्यवरांचा शिवजयंती समारंभ समितीच्या वतीने मी स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. निवृत्त प्राथमिक शिक्षक भिवा गावडे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आमदार प्रवीण आर्लेकर व जीत आरोलकर यांचा हस्ते गौरव करण्यात आला. बालशिवाजीची वेषभूषा केलेले युवराज विराज हरमलकर यांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर व इतर मान्यवरांनी शिवाजी महाराज्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुष्पाजंली वाहिली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.









