आमदार प्रेमेंद्र शेट
प्रतिनिधी/पणजी
गृह आधार योजनेचे लभार्थी हयात आहेत की नाही तसेच त्यांच्या संबंधीची माहिती गोळा करण्यसाठी सरकारने नेमलेल्या एजन्सीचे काम योग्य पध्दतीने झालेले नाही त्यात अनेक त्रूटी आहेत त्यामुळे हयात असलेल्या लाभार्थींवर अन्याय होतो. लाभार्थींची योग्य आणि अचूक माहिती त्वरीत देण्याबाबत सरकारने संबंधीत एजन्सीला निर्देश देण्याची गरज आहे. अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली आहे.
एजन्सीचे कर्मचारी घराघरात फिरून लाभार्थींची माहिती गोळा करीत असतात. ग्रमीण भागातील अधिकाधिक लोक शेतकरी असल्याने ते शेतात जात असतात. ज्यावेळी एजन्सीचे लोक माहिती गोळा करण्यासाठी येतात त्यावेळी लाभार्थी त्यांना घरी मिळत नाही. अशा वेळी अंदाजे माहिती लिहून दिली जाते. त्याचा काही जणांना फायदा होतो तर काही जणांना नुकसान होते. एकूणच एजन्सीच्या कामात त्रूटी रहातात. असेही प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
आपल्या मतदार संघातीलच नव्हे तर संपूर्ण गोव्यात असाच प्रकार झालेला असून अनेक लाभार्थींना गृह आधार योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने कागपत्रे तयार करावी लागतात.









