बेळगाव : मंडोळी रोडवरील गुऊप्रसाद कॉलनी-भवानीनगर येथील बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. बसथांबा पूर्णपणे कुचकामी ठरला आहे. बसण्यासाठी असलेली आसन व्यवस्था मोडून पडली आहे. त्यामुळे वृद्ध, तसेच महिलांना त्या ठिकाणी थांबणे कठीण झाले आहे. तेव्हा तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. भवानीनगर येथे बसथांब्याची उभारणी अलिकडेच करण्यात आली आहे. मात्र काही वर्षांतच हा बसथांबा पूर्णपणे खराब झाला आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी थांबणे देखील अवघड झाले आहे. बसथांबा खराब झाल्यामुळे उन्हाळ्यात इतर ठिकाणी बसची वाट पहात थांबावे लागत आहे. तर आसन व्यवस्था खराब झाल्यामुळे बसणे देखील अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
Previous Articleसाईराज, मझर, रेघ संघांची विजयी सलामी
Next Article गुंजीतील बंद पथदीप सुरू करण्याची मागणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









