नवी दिल्ली : पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर ९० व्या इंटरपोलच्या आमसभेला संबोधित केले. १९५ देशांचे मंत्री, पोलीसप्रमुख राष्ट्रिय केंद्रीय ब्युरोचे प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या आमसभेला उपस्थिती लावली. ही आमसभा १८ ते २१ ऑक्टोबरच्या दरम्यान नवी दिल्ली येथे होत आहे.
यावोळी बोलताना पंतप्रधान म्हणाले. “पुढे जाताना इतिहासातसुद्धा पहाण्याची सध्याची वेळ आहे. आपले वेद म्हणतात कि, सर्व दिशांनी उदात्त विचार येऊ द्या. भारत देश जागतिक सहकार्यावर विश्वास ठेवतो.
पुढे बोलताना ते म्हणाले, “इंटरपोल एक ऐतिहासिक टप्पा गाठत आहे. २०३३ मध्ये इंटरपोल आपली १०० वर्षे साजरी करेल. जगाला सुंदर बनवण्यासाठी इंटरपोल हे एक सार्वत्रिक सहकार्याचे चांगले उदाहरण आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वोच्च योगदान देणाऱ्या राष्ट्रापैकी भारत एक असेल. जगभरातील दहशतवादाचा पराभव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रणनिती विकसीत करण्याची गरज आहे” असे देखिल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Previous Articleशिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव
Next Article घरच्या घरी बनवा खमंग आणि खुसखुशीत शेव









