हिंदु जनजागृती समितीच्या प्रथमोपचार कार्यशाळा
म्हापसा : समाजाला प्रथमोपचार शिकवून आपण समाजऋण फेडू शकतो. प्रथमोपचार प्रशिक्षणाची आज समाजाला खूप आवश्यकता आहे. यासाठी योग्य प्रथमोपचार प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. तसेच शाळांमधून प्रथमोपचार प्रशिक्षण देणे, ही आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मरड, म्हापसा येथील तुळशीराम सभागृह येथे आयोजित प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी या नात्याने हेमश्री गडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुऊवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून झाली. राजश्री गडेकर पुढे म्हणाल्या, ‘पुढे आपत्काळाच्या दृष्टीने प्रथमोपचाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण प्रथमोपचार प्रशिक्षण घेतल्यास स्वत:चे आणि इतरांचेही रक्षण करू शकणार आहोत. यावेळी हेमश्री गडेकर यांचेही समयोचित भाषण झाले. प्रशिक्षण कार्यशाळेत सर्पदंश झाल्यावर आपण काय करू शकतो? पडल्यावर अस्थिभंग झाल्यास आपण काय करू शकतो? आदींविषयी प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोनम शिरोडकर यांनी केले. या कार्यक्रमाचा 60 जणांनी लाभ घेतला. असे उपक्रम गावागावात व्हावे अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया कार्यशाळेनंतर उमटली.









