प्रतापगड :
लादपूर-महाबळेश्वर मार्गावरील नांबेनळी घाट हा पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाला जोडणारा अत्यंत हत्त्वाचा रस्ता मानला जातो. मात्र रवर्षी पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याचे प्रमाण वाढते. परिणामी वाहतूक ठप्प होते आणि हजारो नागरिक – पर्यटकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. यंदाही १० ते १४ जुलै रम्यान रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी आदेश देऊन आंबेनळी बाट वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.
- अनेक वर्षापासून पर्यायी रस्त्याची मागणी
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते आंबेनळी घाटासाठी पर्यायी स्त्याची मागणी करत आहेत. माजी रपंच प्रकाश कदम यांनी पितळवाडी-वनाळे-आंबेमाची-चिरेखिंड हा डार्ग पर्यायी रस्त्यासाठी सुचवला नेता. तत्कालीन आमदार व सध्याचे यगडचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी या मार्गाचे काम सुरू करून दिले होते. मात्र निधीअभावी काम अपूर्ण राहिले. द्यस्थितीत रस्ता केवळ कच्च्या स्वरूपात यार असून, त्यावर आवश्यक निधीचीगुंतवणूक झाल्यास हा मार्ग खऱ्या अर्थाने आंबेनळी घाटाचा पर्याय ठरू शकतो.
- कुडपण मार्ग: पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा
पोलादपूर-कुडपण-कोंडोशी-कुमठे-वाडा-कुंभरोशी हा पर्यायी मार्ग देखील सुचवण्यात आला आहे. कुडपण गावाला ‘मिनी महाबळेश्वर’ अशी ओळख असून, पावसाळ्यात येथे निसर्ग सौंदर्याची जादू खुलते. जर हा रस्ता विकसित झाला, तर सातारा व रायगड जिल्ह्याला जोडणारा पर्यटनदृष्ट्या समृद्ध मार्ग तयार होऊ शकतो. तसेच महाबळेश्वरकडे येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी हे एक नवीन आकर्षण स्थळ ठरू शकते.
- दाभील मार्गही ठरू शकतो उपयुक्त
पोलादपूर-देवळेदाभील मार्गावरून वाडा-कुंभरोशी या भागाला जोडणारा आणखी एक पर्यायी रस्ता कमी दरडी आणि घाटाच्या धोका असलेल्या मार्गासाठी उपयोगी ठरू शकतो.
- स्थानिकांचे प्रशासनाला आवाहन
या सर्व पर्यायी मार्गाची एकात्मिक पाहणी व आराखडा तयार करून, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा व रायगड जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. या मार्गामुळे केवळ पर्यटकांना नव्हे, तर भाजीपाला, दूध, विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांना महत्वपूर्ण लाभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक प्रशासनाकडे विनंती करत आहेत. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
- शिवकालीन मार्गाच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव
पार-महाबळेश्वर मार्गे आड-किनेश्वर-श्री रामवरदायिनी मंदिर या शिवकालीन ऐतिहासिक मार्गाचा देखील पर्यायी रस्त्यासाठी विचार सुरू आहे. या मार्गाचे बहुतांश काम पूर्ण असून, केवळ दीड ते दोन किलोमीटरचे काम बाकी आहे. महाबळेश्वर व पोलादपूर या दोन्ही बाजूंनी रस्त्याचा काही भाग आधीच तयार आहे








