कोल्हापूर / संग्राम काटकर :
कबड्डी खेळाचे राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवासी प्रशिक्षण केंद्र सुऊ करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापुरातील आजी-माजी कबड्डी खेळाडू व प्रशिक्षकांकडून केली जात आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारला पटवून सांगितल्यास प्रत्येक क्रीडा प्रबोधिनीत कबड्डी प्रशिक्षण केंद्र सुऊ होण्यास वेळ लागणार नाही, असा सूर कबड्डी प्रशिक्षक व खेळाडूंमधून उमटत आहे.
महाराष्ट्रातील सर्वच क्रीडा प्रबोधिनीत कबड्डी खेळाचे निवासी प्रशिक्षण केंद्र सुऊ केल्यास शालेयपासून ज्युनिअर कॉलेजातील शहरीसह ग्रामिण भागातील मुला-मुलींना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे मैदान गाजवण्याची संधी तर मिळेल. इतकेच नव्हे मुला-मुलीना कबड्डीत करीअर करण्याची संधीही मिळत राहणार आहेत.
दरम्यान, शासनाच्या शिवछत्रपती क्रीडापीठअंतर्गत महाराष्ट्रात कोल्हापूरसह पुणे, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा 9 जिह्यात क्रीडा प्रबोधिनी आहेत. या प्रबोधिनीत राज्यभरातील कोणत्याही 17 व 19 वर्षाखालील खेळाडूंना चाचणीद्वारे प्रवेश दिला जातो. त्यांना कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, जलतरण, बॅडमिंटन, हॉकी, ज्युदो, टेबल-टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टीक्स, शुटींग, अॅथलेटिक्स, आर्चरी, हॅण्डबॉल, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सिंग अशा 17 खेळांचे आधुनिक प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण अगदीच शास्त्राsक्त पद्धतीचे असते. प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक हे एनआयएस कोचचा कोर्स केलेलेच असतात. संतुलीत आहारासह अद्यावत क्रीडा सुविधा खेळाडूंना दिल्या जातात. क्रीडा प्रबोधिनीतून विविध खेळांचे प्रशिक्षण घेतलेल्या अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधीत्व करत पदक प्राप्त केल्याचे तर सर्वज्ञात आहे.
- खेळाडूंना मैदान गाजवण्याची संधी मिळेल…
एकंदरीत महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला चालना देणाऱ्या क्रीडा प्रबोधिनींमध्ये कबड्डी खेळाचे निवासी प्रशिक्षण केंद्र नसावे याच्या वेदना आजी-माजी खेळाडूंना, प्रशिक्षकांना होत आहेत. मुळात कबड्डी हा खेळ गरीब व शेतकरी कुंटुंबात वाढणाऱ्या तऊण-तऊणींचा खेळ आहे. त्यांना चांगले प्रशिक्षण मिळत राहिल्यास इतर खेळांमधील महिला व पुऊष खेळाडूंप्रमाणे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय संघातून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत राहणार आहे. आणि ही संधी क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून उपलब्ध कऊन देणे सोपे जाणार आहे.
- चार राज्यात सरकारची कबड्डी प्रशिक्षण केंद्रे
सध्या हरियाणा राज्यामध्ये कबड्डीचे प्रशिक्षण देणारी 15 ते 20 निवासी कबड्डी प्रशिक्षण केंद्रे आहे. हॉस्टेल्सही आहेत. या पैकी काही केंद्रे व हॉस्टेल्स ही भारत सरकारच्या भारतीय खेल प्राधिकरण (साई) व काही केंद्रे व हॉस्टेल्स हरियाणा सरकारकडून चालवली जातात. प्रशिक्षण, निवास, भोजन व खुराक आदींचा खर्च सरकारच करत असते. याच धर्तीवर राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथील राज्य क्रीडा प्रशिक्षण केंद्राद्वारे खेळाडूंना कबड्डीचे प्रशिक्षण दिले जात आहे. खेळाडूंचा गरजेनुसार सरकारच्या कबड्डीच्या प्रशिक्षण व सरावासाठी इफ्रास्ट्रक्चर उभा करत आहे. असे चित्र महाराष्ट्रातही तयार करता येऊ शकते. हे काम महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन नक्की कऊ शकते, असा आशावाद खेळाडू व प्रशिक्षक बाळगून आहेत. सध्या राज्य असोसिएशनमध्ये निवडणूक प्रक्रीयेवऊन वाद सुऊ आहे. वादाचे हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. वादावादीमुळे महाराष्ट्रातील कबड्डी वाढीला फटका बसत आहे. हा फटका रोकायचा असेल तर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यातील मतभेद विसऊन राज्यातील क्रीडा प्रबोधिनीत निवासी कबड्डी प्रशिक्षण केंद्र सुऊ करण्यासाठी महाराष्ट्र व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल, एवढीच कोल्हापुरातील आजी-माजी कबड्डीपटूंची मागणी आहे.
राज्य सरकारकडून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यासाठी कोटी ऊपये खर्च केला जातो. परंतू त्यानंतर मात्र कबड्डीला चालना मिळेल असे काहीच केले जात नाही हे काही योग्य नाही, अशा शब्दात आजी-माजी कबड्डीपटू नाराजीही व्यक्त करत आहेत. ही नाराजी दुर करायची असेल आणि खरोखरच राज्यात दर्जेदार कबड्डीपटू घडवायचे असतील तर सरकारला आज नाव उद्या क्रीडा प्रबोधिनीत निवासी कबड्डी प्रशिक्षण केंद्र हे सुऊ करावेच लागेल यात शंका नाही.
- तरच गतवैभव मिळवता येईल
दोन दशकांपूर्वी राष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धांच्या विजेतेपदाचा दावेदार राहिलेल्या महाराष्ट्राची कबड्डी सध्या थोडीशी पिछाडीवर आहे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच क्रीडा प्रबोधिनीसह अन्यत्रही निवासी कबड्डी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करावी लागतील. तेथे चांगले कोच उपलब्ध कऊन खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. केंद्र व राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने हातात हात घालून प्रयत्न केल्यास प्रशिक्षण केंद्र स्थापन होण्यास उशिर होणार नाही.
-दीपक पाटील (एनआयएस कबड्डी कोच)
- खेळाडूंना कबड्डीत करीअर करता येईल…
प्रो-कबड्डीमुळे कबड्डीला देशात ग्लॅमर आले आहे. त्यामुळे ग्रामिण भागासह शहरी भागातील मुले-मुलींचा ओढाही कबड्डीकडे वाढलेला दिसतो आहे. क्रीडा प्रबोधिनीत निवासी कबड्डी प्रशिक्षण केंद्र सुऊ झाल्यास खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण मिळत राहिल. तसेच खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यत पोहोचतीलच. शिवाय व्यावसायिक प्रो-कबड्डीतील संघांमध्येही त्यांना स्थान मिळत राहिल. आगामी काळात हेच खेळाडू एक करीअर म्हणून प्रशिक्षक, पंच बनून कबड्डीच्या वाढीला चालना देत राहतील.
-दादासाहेब पुजारी (प्रो-कबड्डी खेळाडू)








