लोणावळा : मावळमधील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. शेळके यांच्या नेतृत्वाखाली नऊ पैकी सहा ग्रामपंचायतीचे सरपंच राष्ट्रवादी पक्षाचे झाले तर तीन ठिकाणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे मावळात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आले असताना देखील भाजपाला या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मावळ तालुक्यात 9 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत 45 सदस्य बिनविरोध तर शिरगाव ग्रामपंचायत संपूर्ण बिनविरोध झाली होती. यासह इंदोरी, गोडुंब्रे, देवले, कुणेनामा, वरसोली, सावळा, भोयरे व निगडे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांच्या उपस्थितीत पार पडली.
ग्रामपंचायत व सरपंचपदी विजयी झालेले उमेदवार
- कुणेनामा ग्रामपंचायत – सुरेखा संदीप उंबरे (506 मते)
- वरसोली ग्रामपंचायत – संजय बबन खांडेभरड (709 मते)
- देवले ग्रामपंचायत – वंदना बाळू आंबेकर (582 मते)
- इंदोरी ग्रामपंचायत – शशिकांत राजाराम शिंदे (1775 मते)
- निगडे ग्रामपंचायत – भिकाजी मुक्मयाजी भागवत (654 मते)
- सावळा ग्रामपंचायत – मंगल नागू ढोंगे (454 मते)
- गोडूंब्रे ग्रामपंचायत – निशा गणेश सावंत (376 मते)
- भोयरे ग्रामपंचायत – वर्षा अमोल भोईरकर ( 489 मते)
- प्रविण साहेबराव गोपाळे (बिनविरोध)