ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बंडानंतर अजित पवार गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यावर आजच्या बैठकीत शरद पवारांनी भाष्य केलं आहे. सामान्य माणसाच्या अंतकरणात पक्षाची भूमिका आहे, तोपर्यंत चिंता करू नका. पक्षाचे चिन्ह आणि नाव जाणार नाही, मी ते जाऊ देणार नाही, असे म्हणत शरद पवारांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.
शरद पवार यांच्या उपस्थित वाय बी सेंटरमध्ये पक्षाचा मेळावा झाला. या मेळाव्यात ते बोलत होते. माझ्या राजकीय जीवनात अनेक निवडणूक लढवल्या. प्रत्येक वेळी वेगवेगळी चिन्ह होती. पहिल्या निवडणुकीत चिन्ह बैल होते. मग काँग्रेस फुटली. त्यानंतर गाय, वासरू, चरखा असे चिन्ह मिळाले. त्यानंतर मी घडय़ाळ चिन्ह घेतले .
अजित पवार गटाचे नाणे लोकांमध्ये खपणार नाही. हे त्यांना माहित आहे. त्यामुळे मी बजावून देखील ते माझा फोटो वापरतात. फुटीर गटाने पक्ष ताब्यात घेणे हे लोकशाहीत योग्य नाही. मी काँग्रेस सोडली तेव्हा काँग्रेसची प्रॉपर्टी सोडून दिली होती. त्यामुळे फुटीर गटाने पक्षावर दावा करु नये.








