ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गमवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ॲक्टिव मोडवर आला आहे. राष्ट्रवादीने कर्नाटक विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीसाठी 10 ला मतदान होणार असून, 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, आता राष्ट्रवादीनेही ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी 50 पेक्षा जास्त जागा कर्नाटकात लढवण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होईल. या बैठकीत उमेदवारांची निश्चिती होणार असल्याचेही समजते.








