जळगाव / प्रतिनिधी :
आगामी काळात जळगाव वा अन्य जिल्हय़ांमध्ये वर्चस्व निर्माण कराचे असेल, तर नवीन नेतृत्व उभे करावे लागेल, नवीन नेतृत्वाला उमेदवारी द्यावी लागेल, अशी सूचना पक्ष प्रतोद अनिल पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले, मी प्रथमच आमदार झालो, अजितदादा व भुजबळांनी विश्वास टाकत मंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हय़ातील विकासाची गती वाढविता येईल. येथे राष्ट्रवादीला उतरता कळा लागली आहे. आमदार कमी आहेत. खासदार नाहीतच. मोजक्याच संस्था आपल्या ताब्यात आहेत. कदाचित बऱ्याच वर्षांपासून तेच ते नेतृत्व असल्याने हे होत असेल. आता आगामी काळात आपल्याला वर्चस्व निर्माण करायचे असेल, तर नवीन नेतृत्व निर्माण उभे करायला हवे. म्हणूनच नव्या नेतृत्वाला उमेदवारी द्यायला हवी.
प्रारंभी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार म्हणाले, अनिलदादा हे अजितदादांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची संघटना नव्याने बांधायची आहे.








