ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यापाठोपाठ त्रिवेदी यांनीही शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रातून टीकेची झोड उठत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत त्रिवेदी यांचा समाचार घेतला आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांवर आता सुधांशू त्रिवेदी हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा सवाल त्यांनी ट्वटिमधून उपस्थित केला. तसेच पाणी आता डोक्यावरून चाललंय. त्यामुळे डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
अधिक वाचा : राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास 1 लाखाचे रोख बक्षीस
काय म्हणाले होते सुधांशू त्रिवेदी?
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना? असं सुधांशू त्रिवेदी म्हणाले होते.