ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात काल रात्री झालेल्या बैठकीत खातेवाटपाबाबत तोडगा निघाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकूण 9 आमदारांनी युती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर 13 दिवसांनी युती सरकारचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला. शिंदे गटाकडील 4 खाती आणि भाजपकडील 5 खाती अजित पवार यांच्या गटाला देण्यात येणार आहेत. अर्थ खातं अजित पवार यांच्याकडे तर सहकार खातं दिलीप वळसे-पाटील यांना देण्याचे बैठकीत ठरल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.
भाजपकडील अर्थ, सहकार, महिला व बाल कल्याण, अन्न व नागरी पुरवठा आणि क्रीडा व युवक कल्याण तर शिंदे गटाकडे असलेले कृषी, परिवहन, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्यांक खाते राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
अजित पवार गटाला मिळणारी संभाव्य खाती
अर्थ – अजित पवार
सहकार- दिलीप वळसे पाटील
परिवहन- धर्मराव अत्राम
कृषी – छगन भुजबळ
सामाजिक न्याय – धनंजय मुंडे
अन्न नागरी पुरवठा – अनिल भाईदास पाटील
महिला बाल कल्याण – अदिती तटकरे
क्रीडा – संजय बनसोडे
अल्पसंख्यांक – हसन मुश्रीफ








