ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sarad Pawar) गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. पवारांना निमोनिया झाल्याने त्यांच्याव रुग्णालयात उपचार सुरु होते. तर शिर्डीत (shirdi) राष्टवादीचे मंथन शिबीर होते याला शरद पवार हजर राहणारी की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र आजारी असतानाही शरद पवार यांनी आज शिर्डीतील कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पण यावेळी फक्त ते चार मिनिटंच बोलले. त्यांच उर्वरित भाषण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.
यावेळी केलेल्या भाषणात शरद पवार म्हणाले की, मी सगळ्यांची भाषणं ऐकली नाहीत, पण काही भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. सध्या मी एवढंच सांगू इच्छितो की, आज मला सविस्तर बोलणं शक्य नाही. कारण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसा सल्ला दिला आहे. आणखी १० ते १५ दिवसांनी मला नेहमीचं काम करता येईल, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पण या शिबिरातीन एक संदेश जात आहे की, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने हा पक्ष मजबूत करणार आहे. महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यामध्ये आहे, ही संधी लवकरच मिळेल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : आदित्य ठाकरेंच्या बुलढाण्यातील सभेला परवानगी नाकारली
शरद पवार थेट रुग्णालयातून डिस्चार्ज घेत शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्याला हजर झाले. डॉक्टरांच्या टीमसह ते हेलिकॉप्टरने मेळाव्यात आले. दरम्यान शिर्डीहून पुन्हा ते रुग्णालयात दाखल होणार आहेत.
यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उर्जा निर्माण केली. पवार म्हणाले की, तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल असी आशा आहे, असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. शरद पवारांनी अगदी पाच मिनिटचं कार्यकर्त्यांना संबोधित केले, पण यावेळी त्यांचा आवाज थोडा क्षीण होता, चेहरा निस्तेज दिसत होता, तसेच आजचं भाषण त्यांनी उभ राहून नाही तर बसून केले. त्यांच्या हाताला बँडेज लावलेले दिसत होते.








