ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जेजुरीतील राष्ट्रवादीचे नेते मेहबूब पानसरे यांची चार ते पाच जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली. पानसरे हे जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते. खा. सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पानसरे हे शुक्रवारी सायंकाळी नाझरे धरण परिसरात ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करत होते. त्यांच्यासोबत अन्य दोघेजण होते. त्यावेळी शेतजमिनीच्या जुन्या वादातून पानसरे यांच्यासह तिघांवर चार ते पाच जणांनी कोयत्याने वार केले. यात पानसरे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पानसरे यांच्या हत्येमुळे जेजुरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी किरण वनेश परदेशी, वनेश प्रल्हाद परदेशी, स्वामी वनेश परदेशी यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.