Jitendra Awad Bail : भाजप महिला पदाधिकारी विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा मिळाला. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. भाजपच्या रीरा राशीद यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांनी घटनास्थळीची व्हिडिओ क्लीप कोर्टात सादर करत युक्तीवाद केला. यामध्ये आव्हाड हे बाजूला सारत वाट काढत असताना दिसत आहे. यामध्ये कोणताही विनयभंग झाला नसल्याचे वकिलांनी सिध्द करून दाखवले.
आव्हाड यांना जामीन मिळू नये म्हणून सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला होता.वर्तकनगर पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रारीनंतर आव्हाड यांनी पोलिसांच्या अटी- शर्तीचं पालन केलं नाही अस सरकारी वकिलांनी युक्तीवादात मुद्दे मांडले.अटकपूर्व जामीनाला पोलिसांनी देखील विरोध केला होता.मात्र आव्हाडांचे वकिल अॅड. गजानन चव्हाण यांनी न्याधीशांना व्हिडिओ क्लीप दाखवत आव्हाड यांनी जाणीवपूर्वक धक्का दिला नसल्याचे सांगितलं.संबधित तक्रारदार महिलेला आव्हाड बहिण मानतात. आणि बहिण मानलेल्या महिलेचा विनयभंग ते कसे करतील असा प्रश्न उपस्थित केला. गर्दीतून वाट काढत असताना बाजूला व्हा , एवढ्या गर्दीत कशाला येता असं म्हटल्याचं निदर्शनास आणून देत युक्तीवाद केला.दोन्ही बाजूचा युक्तीवाद एेकल्यानंतर कोर्टाने आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.शिवाय तपासात सहकार्य करण्याची अट घातली आहे.
Previous Articleपरदेशात शिक्षणाचे स्वप्न पडले महागात; 13.5 लाखांची फसवणूक
Next Article चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय








