सांगली : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर उत्साहात साजरा होत असताना त्या दिवशी एसटी बस चालवून मी जर गुन्हा केला असेल तर सरकारने माझ्यावर जरुर कारवाई करावी. असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विरोधकांना दिले.
मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर साजरा होत असताना यात एसटी महामंडळाचे कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यांनी विनंती केल्यामुळे मी बस चालविली. शिवाय माझ्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही आहे. एसटी बस चालवून मी जर काय गुन्हा केला असेल तर सरकारने माझ्यावर जरुर कारवाई करावी असे म्हणाले.
माझ्याकडे लायसन्स… कारवाई करा-
जयंत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी एसटीचं सारथ्य केलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे एसटी चालवण्याचं लायसन्स आहे की नाही, यावरुही सवाल उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, लायसन्स माझ्याकडे आहे, असं त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. ‘कायद्याने काय कारवाई करायची आहे, ती त्यांनी करवी. मी चुकलो असेन तर माझ्यावर कारवाई करावी’, असंही ते म्हणाले आहेत. एका लोकप्रतिनिधीने एसटीचं सारथ्य केल्यामुळे सर्वसामान्यांना आनंद झाला होता, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








