ऑनलाईन टाम/तरुण भारत
विरोधक रोपज म्हणत आहे, काही ना काहीतरी होणार आहे, मात्र काहीच होणार नाही, मीच तुमच्या उरावर बसणार आहे, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath shinde) यांनी या शब्दात शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. रावेर तालुक्यातील ऐनपूरमध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) जनसंवाद यात्रेत बोलताना खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीका केली.
विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्यात येत आहे. काहीना काही खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा यांचा प्रयत्न असून तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असे म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारला आव्हान दिले आहे. माझा कितीही छळ केला. मला कितीही त्रास दिला, तरी मी सर्वांच्या उरावर बसेन, या शब्दात एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : अब्दुल सत्तारांच्या ‘छोटा पप्पू’ टीकेला सुनील राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा बाप…
बच्चू कडू (Bachhu Kadu)– रवी राणा (Ravee Ranan यांच्यातील वादावरही खडसेंनी प्रतिक्रिया दिला. राणांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केले होते. त्यावर बच्चू कडूंनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करण्याचे आव्हान त्यांना दिले. बच्चू कडू यांनी आपल्या संपर्कात सात ते आठ आमदार असून पुरावे नाही दिले तर निर्णय घेण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी एकप्रकारे सरकारलाच आव्हान दिलं आहे. बच्चू कडू यांची ही सुरुवात आहे. त्यामुळे शिंदे गटात गेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात आहे, असा दावा खडसे यांनी केला.