आता विकासाच्या डबल इंजिनला अजितदादा यांनी तिसरे इंजिन जोडले असून त्यामुळे राज्याचा विकास वेगाने होणार असल्याची खात्री राज्याचे मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ते आज राजभवनाबाहेर शपतविधी समारंभानंतक बोलत होते.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 35 आमदारांना बरोबर घेऊन शिंदे- भाजप सरकारला पाठींबा देण्यासाठी राजभवानावर दाखल झाले. राज्यपालांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रपदासोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अजितदादा आणि त्यांच्या आमदारांचे मनापासून अभिनंदन आणि स्वागत. पक्षातील कर्तृत्वान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान मिळाल्यावर काय होते ते यापुर्वीच आपण पाहीले आहे. राज्यात डबल इंजिन सरकार आहेच पण अजितदादा यांच्या रुपाने राज्याला आणखी एक इंजिन जोडले गेले असल्याने आता ते आता ट्रिपल इंजिन झाले आहे. राज्यात आता विकासाचे राजकारण होणार. राज्याचा विकास ज्या वेगाने सुरु आहे त्यासाठीच अजित दादांनी पाठींबा दिला आहे.”असे मुख्यमंत्री म्हणाले.