कोल्हापुरातील दंगा झाला हे आम्हला मान्य नाही. ज्यावेळी कोल्हापूरात दंगा झाला त्यावेळी नाकाबंदीच्य़ा आदेशाची वाट पोलीस पहात होते. दंगेखोर आले दंगा करून गेले. कोल्हापूरात अजूनही पुरोगामी विचार असून तो प्रतिगामी विचाराचा नेहमीच विरोध करत आला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. तसेच गद्दारांना आता कोल्हापुरी पायताण दाखवण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक दसरा चौकात त्यांची सभा होत आहे. या व्यासपीठावरून बोलताना ते म्हणाले, “कोल्हापूरच्या सगळ्या पैलवानांना भेटायला वस्ताद आला असून आमचा वस्ताद भयंकर आहे, ते स्वतःच सांगतात की येता का कुस्ती खेळायला.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “शाहू महाराज यांच्या घराण्यातच माणुसकी आहे. राज्यातील नवीन पिढीला शाहू महाराज पुन्हा समजून सांगायला पाहिजे. कोल्हापुरातील दंगा झाला हे आम्हला मान्य नाही. पोलीस नाका बंदीची ऑर्डर येण्याची वाट बघत होते, पण आदेश आलाच नाही. बाहेरचे तरुण कोल्हापूरात आले आणि दंगा करून गेले. आम्हाला प्रबोधनकार ठाकरे यांचे हिंदुत्व आम्हला मान्य आहे. ठाकरेंचं हिंदुत्व अहिंसेच होतं पण तुमचं हिंदुत्व हिंसेचे आहे. म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व स्वीकारलं.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “गद्दारी काहींच्या रक्तातच होती. पण साप आता बिळातून बाहेर येत आहेत. गद्दारांना आता कोल्हापुरी पायताण दाखवण्याची वेळ आली आहे. इलेक्शन कमिशन सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाले आहे. आंबा, भिडेचा हा महाराष्ट्र नाही तर शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे.” असेही ते म्हणाले.








