Jayant Patil : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे विधान जयंत पाटील यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं तेव्हा कोट्यावधींच्या देवाणघेवाण झाली. हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असं वाटत नाही. शिंदेगटातील आमदारांचं पुढच्या टर्मला निवडूण येणं कठीण आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारला लगावला. 2024 ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्तेत येतो, असे भाजपने म्हटले असते तरी लोकांनी त्यांना स्विकारलं असतं. पण आता महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेलं नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील. असही जयंत पाटील म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








