ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवारांच्या या बंडामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असले तरी राष्ट्रवादी पक्ष आणि घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह आमचे आहे, असा दावा अजित पवार गटातर्फे करण्यात आला होता. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ आहे. पक्षात दोन गट नाहीत, असे शरद पवार यांना सांगिल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड आणि आ. सुनील भुसारा यांनी या दुजोरा दिल्याचे एका संकेतस्थळाने म्हटले आहे.
अजित पवार गटाने पक्ष आणि घडय़ाळ चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली होती. शरद पवार गटाने यावर उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे. पक्षात दोन गट नाहीत. आयोगाने त्या पत्राची दखल घेण्याची गरज नव्हती. तर अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेली मागणी फेटाळावी,’ असे त्यांनी उत्तरात म्हटल्याची माहिती आहे.