मंत्री हसन मुश्रीफ यांचे उद्गार
“छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जयघोषाने कागल शहर दुमदुमले
कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, जल-दुग्धाभिषेक व जन्मसोहळा उत्साहात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाऊंडेशन तर्फे आयोजन
कोल्हापूर
जयघोषाच्या निनादात निप्पाणी वेस येथून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जल्लोषी मिरवणूकीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आणि विचार पिढ्यान् पिढ्या प्रेरणादायी आहेत. ही शिकवण आणि विचार निरंतर जिवंत ठेवूया, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. येथील बसस्थानकाजवळच्या अश्वारूढ पुतळा परिसरात प्रमुख मान्यवरांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, जल व दुग्धाभिषेक व जन्मसोहळा हे कार्यक्रम उत्साहात झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाऊंडेशनने आयोजन केले होते. निप्पाणी वेस येथून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मुख्य बाजारपेठेत बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जल्लोषी सवाद्य मिरवणूक निघाली.
“छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जयघोषाने कागल शहर दुमदुमले. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घातला.
याप्रसंगी भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, महिलांना, युवकांना अशा सर्वच समाजघटकांना आपलं वाटावं असे अठरा पगड जातींचे रयतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले. हे राज्य स्थापन करताना त्यांना शूरवीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशिद, मदारी मेहतर यांच्यासारखे जीवाला जीव देणारे मावळे मिळाले. त्यामुळेच पावणे चारशे वर्षाहून अधिक काळ समाज त्यांच्या विचारांच्या आणि कर्तुत्वाच्या पालख्या वाहत आहे.
सकाळी दहा वाजता शहराच्या मुख्य बाजारपेठेतून सवाद्य मिरवणूक निघाली. मिरवणुकीपुढे हातात शिवज्योत घेतलेले मंत्री हसन मुश्रीफ, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ आदी प्रमुख उपस्थित होते. निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून निघालेली ही मिरवणूक पुढे गैबी चौक, पोलीस स्थानक, खर्डेकर चौक, कोल्हापूर वेस कमानीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापर्यंत आली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय जिजाऊ जय शिवाजी”, “जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणांच्या निनादात ही मिरवणूक निघाली.
यावेळी प्रांताधिकारी श्री. प्रसाद चौगुले, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, तहसीलदार अमर वाकडे, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, गोकुळचे संचालक युवराज पाटील, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, रंगराव पाटील, शशिकांत खोत, मनोजभाऊ फराकटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Article‘कायद्याचा दवाखाना’ संकल्पनेतून तक्रार निवारण
Next Article कोराणेंकडून कोट्यवधींची मालमत्ता खरेदी








