सावंतवाडीत कार्यकर्त्यांचा हाउसफुल्ल मेळावा ; अर्चना घारेंना आमदारकीची उमेदवारी मिळावी ; मेळाव्यात मागणी
सावंतवाडी : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सावंतवाडी मतदारसंघात शुक्रवारी मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे . रविंद्र मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात रविंद्र मंगलकार्यालय कार्यकर्त्याच्या गर्दीने खचाखच भरले होते. संपर्कप्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी मतदारसंघात अर्चना घारे-परब यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोडुन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावंतवाडीत खिळखिळा झाला होता .कार्यकर्तेही पक्षाकडे नव्हते. परंतु जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि अर्चना घारे परब यांनी पक्ष बांधणी केली. अजित पवार गट फुटला असतानाही पक्षाने शुक्रवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत ताकद दाखवली. त्यामुळे पक्ष नव्याने उभारी घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी झालेली गर्दी त्याचे द्योतक आहे.









