राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार अर्ज प्रक्रियेचा प्रारंभ
इस्लामपूर : आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पक्ष कार्यालयातून अर्ज देण्यासाठी सुरुवात झाली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी २१ अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेतले. येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभारी अशोकराव खोत, माजी नगरसेवक भारकर कदम. प्रा. दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते इच्छुक उमेदवारांनी अर्ज स्विकारले.
यामध्ये एकूण पंधरा प्रभागासाठी रियाज मुबारक पटेल, आरती अमोल खोत, विश्वास यशवंत साळुंखे, विद्या शिवाजी पवार, अजित विजयराव पाटील, संजना संजय तेवरे, रेखा मुकुंद रासकर, रुक्साना फारुख इयूरो, फिरोज डारूण पटेल, अक्षय विजयराव कोळेकर, रुपाली अभिजित पाटील, अक्षय हणमंत पाटील, भारकर केरबा कदम, अनुजा स्वप्नील देशमुख-कोरे, संदीप सुनिल वायदंडे, सदानंद दिनकर कुंभार, सलीम कच्छी, महेश परांजपे, स्नेहा बाबासो जाधव, अमर बनसोडे, जयकुमार कांबळे इच्छुक उमेदवारांनी पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणुक लढण्यासाठी अर्ज घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांचे सामाजीक, राजकीय, सहकार,क्रीडा, सांस्कृतीक क्षेत्रातील कामकाज पाहिले जाणार आहे.
या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी २८ ते ३० रोजी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक घेणार आहेत. त्याचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्याकडे व प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार, असल्याची माहिती अशोकराव खोत व भास्कर कदम यांनी दिली. राष्ट्रवादीने बेट अर्ज वाटपच केल्याने शहरात आता नगरपरिषद निवडणूकीचे वातावरण तापू लागले आहे.








