Ajit Pawar : लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार असल्याचा निर्णय विरोध पक्षनेते अजित पवार यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी चित्रपट,साहित्य,कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला होता.
गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हिच्या लावणीवरून महाराष्ट्रात संताप पाहायला मिळत आहे. त्यातच गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत असल्याची तक्रार करण्य़ात आली होती. त्यावरून आज अजित पवारांनी हा निर्णय घेतला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राची परंपरा टिकली पाहिजे.कोणी चुकत असेल तर त्यांना अडवलं पाहिजे. मला काल जी माहिती मिळाली त्यानुसार, काही जिल्ह्यात बंदी आहे पण काही ठिकाणी सुरु आहे. मी यासंबंधी संबंधितांशी बोलणार आहे. शक्य झाल्यास अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे.अश्लील डान्समुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणला जात आहे. महाराष्ट्राची काही परंपरा आहेत.ते सर्वांना पाहता येतील अशाप्रकारचे असले पाहिजेत. त्यात अश्लील प्रकार असता कामा नये, असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








