प्रतिनिधी /बेळगाव
एनसीसी बेळगाव मुख्यालयाच्या अधिपत्याखाली 25 कर्नाटक एनसीसी बटालियन जाधवनगर, बेळगाव येथील कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव साहनी यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी परेड मैदानावर 1 ते 10 जून दरम्यान एनसीसी छात्रांचे संयुक्त वार्षिक शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरात विविध ठिकाणाहून 500 हून अधिक कॅडेट्सनी सहभाग दर्शविला. शिबिर काळात छात्रांना प्रशिक्षण, नकाशा निरीक्षण, नेमबाजी प्रशिक्षण, परेड प्रशिक्षण, योगा प्रशिक्षण, तंबू लावण्याचे प्रशिक्षण तसेच एनसीसी अभ्यासक्रम संबंधित व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याबरोबरच थ्रोबॉल, व्हॉलिबॉल आणि धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
यशस्वी छात्रांचा गौरव
एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव साहनी यांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या छात्रांचा गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाने या शिबिराची सांगता झाली. यावेळी एनसीसी अधिकारी, 25 कर्नाटक बटालियन कर्मचारी यांच्यासह
ले. कर्नल नंदकुमार यांनी परिश्रम घेतले.









