47.7 टक्क्यांचा हिस्सा खरेदी करणार
नवी दिल्ली :
इस्पोर्टस कंपनी नझारा टेक्नॉलॉजी रियल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म पोकरबाजीची मूळ कंपनी मूनशाईन टेक्नॉलॉजीमध्ये तब्बल 982 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या संदर्भात नझाराने शुक्रवारी निवेदनात सांगितले की, या करारांतर्गत मूनशाईन टेक्नॉलॉजीमधील 47.7 टक्क्यांचा हिस्सा हा 831.51 कोटी रुपयांना विकत घेणार आहे. यामध्ये 592.26 कोटी रुपयांचे रोख व्यवहार आणि 239.25 कोटी रुपयांच्या शेअर स्वॅप व्यवस्थेचा यात समावेश आहे.
या व्यवस्थेसह, बाजी गेम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक नवकिरण सिंग यांच्यासह निवडक गुंतवणूकदार आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना नझारा टेक्नॉलॉजीजमध्ये 3.17 टक्के हिस्सा मिळेल. याशिवाय, नझारा 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, जे करारानुसार भविष्यात इक्विटीमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.









