शस्त्रांसह स्फोटकांचा साठा जप्त
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील सुकमा येथे शनिवारी सकाळी जवानांनी एका नक्षलवाद्याला चकमकीत ठार केले. ठार झालेल्या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा नक्षलवाद्यांनी सुकमा-विजापूर सीमेवर सुरक्षा दलांच्या तळावर हल्ला केला. चिंतागुफा भागातील तुमालपाडच्या टेकडीवर नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर जिल्हा दल, डीआरजी आणि बस्तर फायटरच्या जवानांना शोध मोहिमेवर पाठवण्यात आले. सैनिक नक्षलवाद्यांच्या अ•dयाजवळ पोहोचल्यावर माओवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक झाली.









