रवि वर्मासोबत काम करणार
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी स्वत:चा आगमी चित्रपट ‘ब्लाइंड बाबू’साठी निर्माता रवि वर्मासोबत काम करत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. निर्मात्यांनी आता चित्रपटाच्या सेटवरून काही खास छायाचित्रे शेअर केली आहेत.
रवि वर्माने नवाजुद्दीनसोबतची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यात नवाजुद्दीन हा चित्रपटाचा क्लॅपरबोर्ड पकडताना दिसून आला आहे. या पोस्टमध्ये पूर्ण टीमचा एक ग्रूप फोटोही आहे. ‘आता बॉम्ब फुटणार का आणखी काही? रहस्य आणि डार्क कॉमेडीसोबत बांधून ठेवणाऱ्या अराजकतेसाठी तयार व्हा, ब्लाइंड बाबूचा प्रवास सुरु’ अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे.
या चित्रपटात नवाजुद्दीनसोबत जाकिर हुसैन, पवन मल्होत्रा आणि मुकेश तिवारी यासारखे अभिनेते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील. नवाजुद्दीनने ‘सरफरोश’ चित्रपटाद्वारे स्वत:ची कारकीर्द सुरू केली होती, परंतु त्याला खरी ओळख ‘पीपली लाइव’, ‘कहानी’, ‘गँग्स ऑफ वासेपुर’ आणि ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटांमुळे मिळाली. त्याने अनेक हिट चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.









