मुंबई : मनी लॉण्ड्रिंग केस प्रकरणात अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांना कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर किडनी आणि इतर व्याधींबाबत उपचार होणार आहेत. मलिकांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. दरम्यान त्य़ांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून कोणत्या ना कोणत्य़ा कारणाने नवाब मलिक हे चर्चेत आहेत. मलिक यांनी याआधी सहा आठवड्यांचा तात्पुरता वैद्यकीय जामीन देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी नामंजूर करण्यात आली होती. त्यांना पुन्हा त्रास होवू लागल्याने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्याची परवानगी मागितली. कोर्टाने त्यांना परवानगी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांची प्रकृती बरी नसून त्यांना बराच त्रास होत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
Previous Articleघोळसगावात सर्पदंशाने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Next Article ‘सारथी’चे संचालक मंडळ बरखास्त करा









