नौदलप्रमुख अॅडमिरल त्रिपाठी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नौदल कुठल्याही क्षणी, कुठेही आणि कुठल्याही प्रकारे भारताच्या सागरी हितांचे रक्षण करणे जारी ठेवणार असल्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी म्हटले आहे. नव्या नौदल भवनात आयोजित नौदल प्रमुखांच्या संमेलनात त्यांनी ही टिप्पणी केली आहे. या संमेलनात सामील 8 माजी नौदल प्रमुखांचा सामूहिक अनुभव आणि ज्ञानाचा लाभ उचलणे हा या संमेलनाचा उद्देश होता असे नौदलाकडून रविवारी सांगण्यात आले.
या माजी प्रमुखांना नौदलाचा धोरणात्मक पुढाकार, तंत्रज्ञान, सामग्री आणि संचालन रसद तसेच संचालनावरून माहिती देण्यात आली. आम्ही आमच्या आकर्षक वारशाला पुढे नेण्यासाठी प्रतिबद्ध आहोत आणि भारतीय नौदल भारताच्या सागरी हितांचे रक्षण करणे जारी ठेवणार असल्याचे नौदल प्रमुख त्रिपाठी यांनी म्हटले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि रणनीतिक नवोन्मेषांना अवलंबत भारतीय नौदलाला एक शक्तिशाली आणि आत्मनिर्भर सागरी दलाच्या स्वरुपात विकसित करण्यात यावे यावर तज्ञांनी जोर दिला आहे. भारतीय नौदल प्रमुखांचे संमेलन संस्थात्मक निरंतरता आणि रणनीतिक विचाराच्या महत्त्वाला दर्शविते.
संमेलनादरम्यान एक सत्र ‘मंथन’चे आयोजन करण्यात आले, ज्यात महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला, ज्यामुळे उदयोन्मुख भू-राजकीय स्थिती आणि युद्ध तसेच सागरी रणनीतिच्या भविष्यावर चर्चा झाली. संमेलनादरमयन लीगेसी ऑफ लीडरशिफ : नेव्हल चीफ्स थ्रू टाइम नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात माजी नौदल प्रमुखांशी निगडित प्रेरक घटनांचे वर्णन करण्यात आले आहे. दिल्लीतील नौदल भवन हे नौदलाचे मुख्यालय आहे.









