समुद्रातील बचाव मोहिमांना मिळणार मजबुती : हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडकडून निर्मिती
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाला पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल ‘निस्तार’ सोपविले आहे. हे जहाज भारतातच डिझाइन करण्यासह देशातच निर्माण करण्यात आले आहे. खोल समुद्रात बचावमोहिमेची क्षमता या जहाजामुळे वाढणार आहे. निस्तार ही एक अशी युद्धनौका आहे, जी खोल समुद्रात पाणबुडी अन् बचावमोहिमेसाठी निर्माण करण्यात आली आहे. याचे नाव संस्कृत शब्द ‘निस्तार’मधून निश्चित करण्यात आले आहे, ज्याचा अर्थ मुक्ती, बचाव असा होतो. हे जगातील काही निवडक नौदलांकडे असलेले खास तंत्रज्ञानयुक्त जहाज आहे.
आकार अन् वजन : हे जहाज 118 मीटर लांब असून याचे वजन सुमो 10,000 टन आहे.
खास उपकरणे : यात आधुनिक डायव्हिंग उपकरण असून जे 300 मीटर खोलीपर्यंत सॅच्युरेशन डायव्हिंग (दीर्घकाळापासून खोल पाण्यात राहणे) आणि 75 मीटरपर्यंत साइड डायव्हिंग ऑपरेशन करू शकते.
बचावाची क्षमता : हे जहाज डीप सबमर्जंस रेस्क्यू वेसलसाठी (डीएसआरव्ही) मदरशिपचे काम करते. जर कुठल्याही पाणबुडीत आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर हे लोकांना वाचविण्याचे काम करते.
खोल समुद्रात काम : यात रिमोटली ऑपरेटेड व्हीकल्स आहेत, जी 1000 मीटर खोलीपर्यंत पाणबुड्यांवर नजर अन् सॅल्वेज ऑपरेशन (समुद्रातून गोष्टी बाहेर काढणे) करू शकते.
स्वदेशी तंत्रज्ञानाची कमाल
‘निस्तार’ची निर्मिती हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने केली आहे. इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (आयआरएस)च्या नियमांनुसार याला डिझाइन करण्यात आले आहे. या जहाजात 75 टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा स्वदेशी आहे. हे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ पुढाकाराचे आकर्षक उदाहरण आहे.
निस्तारचे महत्त्व
नौदलाचे सामर्थ्य वाढले : ‘निस्तार’ भारतीय नौदलाच्या खोल समुद्रात बचाव मोहीम राबविण्याची नवी शक्ती देणार आहे. हे खासकरून पाणबुडी इमर्जन्सीत अत्यंत आवश्यक आहे.
दुर्लभ क्षमता : जगात निवडक नौदलांकडेच असे तंत्रज्ञान आहे. हे जहाज भारताला सागरी रक्षणात आणखी मजबूत करते.
स्वदेशी यश : हे जहाज भारतातच निर्माण करण्यात आले आहे. हे आमची तांत्रिक प्रगती अन् आत्मनिर्भतेला दर्शविते.
‘निस्तार’चे कार्यस्वरुप
‘निस्तार’चे मुख्य काम खोल समुद्रात बचावकार्य करणे आहे. जर एखादी पाणबुडी समुद्रात अडकून पडल्यास किंवा त्यात बिघाड झाल्यास हे जहाज त्वरित बचावमोहीम सुरू करू शकते. याचे आरओव्हीज खोल समुद्रात जात स्थितीचा आढावा घेतात. आवश्यक सामग्री किंवा लोकांना वाचविण्यास मदत करतात. याचबरोबर हे जहाज समुद्रात बुडालेल्या गोष्टींना बाहेर काढण्यासाठीही वापरले जाऊ शकते.









