ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नौदलाचे आडव्हांस लाइट हेलिकॉप्टर आज सकाळी नियमीत उड्डाणादरम्यान मुंबई किनाऱ्याजवळ कोसळले. हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने त्वरित शोध आणि बचावकार्य हाती घेतले. गस्ती क्राफ्टद्वारे तीन क्रू मेंबर्सला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय नौदलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
अधिक वाचा : भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम दक्षिण आशियाचे पहिले न्यायाधीश








