वार्ताहर /बांदा
शेर्ले येथील श्री माऊली सांस्कृतिक कलाक्रिडा मंडळ व ग्रामस्थ शेर्ले नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने गेली दहा वर्षे नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जात आहे . याही वर्षी मंडळाच्या वतीने विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . या धार्मिक सोहळ्याचे उद्घाटन सोमवार दिनांक १६ ऑक्टोंबर ‘ रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी स्थानिक ग्रामठांची भजने नव दुर्गा दांडीया गृप माडखोल व तळवडे दांडिया गृप यांचा दांडीयाचा कार्यक्रम ,दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी रात्री सातपाटेश्वर दशावतार नाटय मंडळ निरवडे नाटय मंडळाचा महान पौराणिक नाटयप्रयोग सादर होणार आहे . १९ ऑक्टोंबर रोजी रात्री विविध दांडिया कार्यक्रम सादर होणार आहे. दिनाक २० रोजी जय हनुमान दशावतार नाटय मंडळ आरोस यांचा महान पौराणिक दशावतार नाटय प्रयोग सादर होणार आहे. तरी या सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्वानी लाभ घ्यावा व सहभागही दर्शवून पुढचे काही दिवस चालणारा सोहळा यशस्वी करावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे









