Aurangabad, Jalna Food poisoning News : नवरात्रोत्सवानिमित्त (Navratrotsav 2022) खरेदी केलेल्या भगर आणि भगरीचें पिठातून विषबाधा होऊन औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी १३ जणांना विषबाधा झाली आहे. तर तर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील २४ जणांना विषबाधा झाली आहे. या घटनेने दोन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की,
औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथे नवरात्रोत्सवानिमित्त भगर व भगरीचें पीठ परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थांनी खरेदी केले होते.या भगरीचे सेवन केल्यानंतर १३ ग्रामस्थांना पोट दुखणे, उलट्या, चक्कर येत असल्याने गावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. यावेळी विषबाधा झाल्य़ाचे लक्षात आले.
जालन्यात २४ जणांना विषबाधा…
औरंगाबाद प्रमाणे जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात देखील भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. परतुर तालुक्यातील चार गावांमधील २४ जणांना विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तर विषबाधा झालेल्या सर्वच व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








